जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
सोलापुरातल्या बार्शीमध्ये रवी क्लासेसचे प्राध्यापक मधुकर डोईफोडेंच्या अपहरणाप्रकरणातील खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे. डोईफोडे 11 मे रोजी सकाळी फिरायला गेले असता त्यांचं अपहरण झालं होतं.
डोईफोडेंच्या कुटुंबियांकडून खंडणीखोरांनी 25 लाखांची मागणी केली होती. या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी रामा साडेकर, सोमनाथ भोसले, अण्णासाहेब राऊत या आरोपींना अटक झाली. तर अपहरणाचा मुख्य सूत्रधार विलास उबाळे फरार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.