कॉपी बहाद्दर, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना शिक्षक कॅमेऱ्यात कैद

कॉपी बहाद्दर, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना शिक्षक कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर, परीक्षेच्या अर्धा तास आधी फोडून सामूहिक कॉपी पुरविण्याकरिता उत्तरपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ त्याच शाळेतील एका शिक्षकाने कॅमेऱ्यात कैद केलाय.

हा व्हिडिओ त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनाही पाठवलाय. मात्र, दहा दिवस उलटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्यानं शिक्षण विभागच या प्रकणात सहभागी असल्याचं समोर येतंय.

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वलनी गावातील गांधी विद्यालयात हा प्रकार घडलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version