Crime News: विद्येच्या मंदिरातच लज्जास्पद कृत्य! अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; शिक्षिकेने तळघरात नेलं अन्…

देशभरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
Crime News: विद्येच्या मंदिरातच लज्जास्पद कृत्य! अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; शिक्षिकेने तळघरात नेलं अन्…

Crime News: देशभरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. दिल्लीतील जनकपुरी परिसरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून शाळेतील एका महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजधानी दिल्लीसह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.

पश्चिम दिल्लीतील जनकपुरी भागातील खासगी शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच ५७ वर्षीय केअरटेकरला आरोपी करण्यात आले होते. आता तपासादरम्यान एका महिला शिक्षिकेची भूमिकाही संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने तिला एक दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: Delhi Crime Case: राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, संबंधित शिक्षिकेनेच मुलीला शाळेच्या तळघरात नेले होते. याच ठिकाणी हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी शिक्षिकेच्या अटकेला योग्य कारवाई असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की, पीडित चिमुरडीने आपल्या कुटुंबीयांना शिक्षिकेबद्दल माहिती दिली होती.

याशिवाय मुख्य आरोपी असलेल्या केअरटेकरला जामीन मिळाल्यामुळेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली असून काही माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे.

हेही वाचा: Pune Bhor Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरण! आरोपीची पोलिस कोठडी आज संपणार; आता पुढे काय?

दिल्ली सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या शिक्षण विभाग आणि पोलिसांकडून शाळेची तपासणी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांची चौकशी आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, नरसापूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे आधीच संतापाचे वातावरण आहे. त्या प्रकरणानंतर आता दिल्लीतील ही घटना समोर आल्याने पालकांमध्ये भीती आणखी वाढली आहे. देशातील शाळांमधील सुरक्षा व्यवस्था, कर्मचाऱ्यांची पडताळणी आणि मुलांच्या संरक्षणासाठीचे नियम यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावरही या दोन्ही घटनांबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version