जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
धावती ट्रेन पकडने एका तरूणाला चांगलंच महागात पडलं असतं. मात्र, एका तिकीट निरीक्षकाच्या प्रसंगावधानतेमुळे त्या तरुणाचा जीव वाचलाय. तरूणाला जीवनदान देणाऱ्या तिकीट निरीक्षकाचे नाव शशिकांत चव्हाण असे आहे. शुक्रवारी सकाळी संदीप सोमना हा लखनऊकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस पकडत होता.
मात्र, ट्रेन सुरू झाल्यामुळे युवकानं धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी असल्यामुळे ट्रेन पकडताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. मागे उभे असलेल्या शशिकांत चव्हाण यांनी वेळीच त्या युवकाला मागे ओढले. आणि त्या युवकाचा जीव वाचवला. धावती ट्रेन पकडू नका अशा प्रकरच्या सूचना रेल्वे स्थानकावर नेहमी करण्यात येतात. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे किती धोकादायक ठरू शकतं हे आपण या व्हिडीयोत पाहू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.