राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.
शरद पवारांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली होती.
तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते.
पवारांच्या या विधानावर नाराज होत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते, त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.