राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांचा काँग्रेस प्रवेश

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांचा काँग्रेस प्रवेश

तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, अन्वर हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य होते.

अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत त्यांनी राष्ट्रवादीला राजीनामा दिला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version