#MeTooचा दंगा… तनुश्रीचा आता राखी सावंतशी पंगा!

#MeTooचा दंगा… तनुश्रीचा आता राखी सावंतशी पंगा!

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आता आणखी भर पडली आहे. तनुश्री दत्ताने आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताबद्दल अनुद्गार काढले होते. राखीने तनुश्रीला ड्रग ऍडिक्ट म्हटलं होतं. त्यामुळेच तनुश्रीने राखीवर 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका आयटम साँगच्या चित्रिकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. तिने ते गाणं करण्यास नकार दिल्यानंतर राखी सावंत हिने त्या गाण्यात तनुश्रीऐवजी डान्स केला. सेटवर तनुश्रीने अमली पदार्थाचं सेवन केलं होतं आणि स्वतःला व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतलं होतं. त्यावेळी तिच्यासोबत विनयभंग झाला होता, त्याबद्दल तिला दहा वर्षांनी तिला जाग का आली, असा सवाल राखी सावंतने केला होता. तसंच मराठ्यांशी पंगा घेऊ नको अशी तंबीही दिली होती. नाना पाटेकर, राज ठाकरे, मनसे यांच्यावर तनुश्री खोटे आरोप करत असल्याचा दावा राखीने केला होता. तनुश्री प्रसिद्धीसाठी हे सर्व नाटक करत असल्याचं राखीने म्हटलं होतं.

एवढंच नव्हे, तर तनुश्रीला अमेरिकेत कुणी विचारत नाही. तिच्याकडे आता काम नाही. तिच्या बँक अकाऊण्टमध्ये पैसा नाही. ती मेंटल असून कधी संन्यासी बनून ती टक्कल करून घेते तर कधी 10 वर्षांपूर्वी विनयभंग झाल्याचा दावा करते. ती भिकारी झाली असून आता ती पैसा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून कॉण्ट्रोव्हर्सी करतेय, असा दावा राखी सावंतने केला होता.

राखी सावंतच्या या आरोपांनी तनुश्री चिडली नसती तरच नवल. नाना पाटेकर, गणेश आचार्य इत्यादींविरोधात तक्रार दाखल केल्यावर आता राखी सावंतवर तनुश्रीने अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. आपली मानहानी केल्याप्रकरणी तनुश्रीने राखी सावंतविरोधात 10 कोटींचा दावा ठोकला आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version