कल्लाकुरिची : विषारी दारू प्यायल्यामुळे तामिळनाडूत ५८ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयात अद्याप १०० पेक्षा जास्त नागरिक आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. तामिळनाडू भाजपाने या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्य सरकारने विषारी दारू प्रकरणात मृतांच्या जवळच्या नातलगांना दहा – दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. रुग्णालयात असलेल्यांना उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सीबी – सीआयडीने विषारी दारू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.