जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्याच्या राजगुरुनगरच्या मांजरेवाडी येथे तलवारीने केक कापल्याची घटना घडलीय. वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापल्यामुळे सहा जणांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा तलवार बाळगून, ती हातात आणि तोंडात धरुन गावामध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.