‘कोरोनाची लस घ्या, अन्यथा आर्थिक दंडाला सामोरे जा’; औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत

‘कोरोनाची लस घ्या, अन्यथा आर्थिक दंडाला सामोरे जा’; औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत

औरंगाबादमध्ये ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याच बरोबर ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली नाही, अश्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणू सापडल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच ओमायक्रॉन विषाणूने देशात शिरकाव केला असून राज्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर देशातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र राज्यातील ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या काही रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली असून कोरोना परिस्थिती स्थिरावल्यामुळे राज्यातील शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन विषूणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच ज्या नागरिकांना कोरोना लस घेतली नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version