ताडोबाची सफर महागणार; प्रवेश शुल्क हजारांच्या घरात

ताडोबाची सफर महागणार; प्रवेश शुल्क हजारांच्या घरात

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन करणं आता सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहणार आहे. कारण वनविभागानं ताडोब्यातील प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे.

पूर्वी 700 ते 1000 असणारे प्रवेश शुल्क आता विकेंडला शनिवारी आणि रविवारी 8 हजार रुपये करण्यात आले आहेत.

तर इतर दिवशी 4 हजार रुपये एवढे शुल्क ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नाही.

या दर वाढीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कालव्यात पाणी पिण्यासाठी गेला असतांना हा वाघ कालव्यात पडला. कालव्यात वाघ पडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्या वाघाला शिड्यांच्या सहाय्याने काढण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version