जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईसह राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली. पण यानंतर साथीच्या आजारांनीही डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी मुंबईच आजारी पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
स्वाईन फ्ल्यूसोबतच इतर आजारांनीही डोकं वर काढलं आहे. गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू यांनी मुंबईकर आजारी आहेत. मुंबईतला वाढता बकालपणा आणि अस्वच्छता यामुळे आजारांवर मात करण्यास आरोग्य विभागाला यश आलेलं नाही.
स्वाईन फ्ल्यूनं तर मुंबईकरांची झोप उडवली. ताप हटत नाही आणि डोकेदुखी असलेल्या मुंबईकरांसाठी पालिकेच्या रुग्णालयात वेगळा कक्ष सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे 15 ते 44 या वयोगटात संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.