अरबी समुद्रावर बिपरजॉय चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलं आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला आहे. त्यातच मुंबईतील जुहू चौपाटीवर सहा मुलं बुडाली. सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश यश आले. चारपैकी दोघांचे मृतदेह सापडले तर, दोघांचा शोध सुरु आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ प्रचंड वेगाने उत्तरेच्या दिशेला मार्गक्रमण करत आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर हाहाकार उडवण्याची भीती आहे. याशिवाय ते पुढे पाकिस्तानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे हवामानात प्रचंड बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात समुद्र खवळलाय. समुद्राच्या उंचच्या उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. असं असताना मुंबईतील जुहू चौपाटीवर सहा मुलं बुडाली. सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश यश आले. चारपैकी दोघांचे मृतदेह सापडले तर, दोघांचा शोध सुरु आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलं आहे. मुंबई महापालिका, हवामान विभाग आणि इतर यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. या दरम्यान जुहू चौपाटीवर फिरायला आलेले सहा जण समुद्रात बुडाले.