स्वदिच्छा सानेचा हत्येकरी अटकेत 

स्वदिच्छा सानेचा हत्येकरी अटकेत 

एमबीबीएसला शिकणाऱ्या पालघरच्या २२ वर्षीय स्वदिच्छा साने बेपत्ताप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. १४ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली बँड स्टँड येथील जीवरक्षक मिथू सिंग याने दिली आहे. आरोपी मिथू सिंगने स्वदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात त्याने ही कबुली दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

स्वदिच्छा साने ही बोईसरमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी नोव्हेंबर २०२१ पासून बँड स्टँड येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वदिच्छाचं शेवटचं लोकेशन हे मुंबई बँड स्टँड येथे दाखवत असल्याने या प्रकरणाचा तपास वांद्रे स्थानिक गुन्हे शाखा कक्ष नऊकडे वर्ग करण्यात आला होता. स्वदिच्छाचा शेवटचा सेल्फी हा बँड स्टँड येथील जीवरक्षक मिथू सिंग याच्यासोबतचा असून १४ महिन्यानंतर मिथु सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर काल उशिरा मिथू सिंगने हत्या केल्याची कबुली दिली असून या प्रकरणात आणखीन तपास वांद्रे स्थानिक गुन्हे शाखा कक्ष ८ तपास करत आहेत.

काय आहे स्वदिच्छाच्या वडिलांचं म्हणणं ?

स्वदिच्छाचे वडील मनीष साने यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. १४ महिन्यांपासून आम्ही मिथू सिंग हाच आरोपी असल्याच सांगत होतो मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही ? जर मिथू सिंग यांनी माझ्या मुलीची हत्या करून समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही ? तसंच तिच्याजवळ असलेलं साहित्य अजून पोलिसांना का मिळालं नाही? असे सवाल उपस्थित करत या प्रकरणात योग्य तपासणी करून कारवाई केली जावी अशी मागणी स्वदिच्छाचे वडील मनीष साने यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी नौदलाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने शुक्रवारी समुद्रात मुलीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे. आरोपी सिंहने आपल्या जबाबात दावा केला आहे की, त्याने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर बँडस्टँडजवळ समुद्रात फेकून दिला. मात्र त्याने तिची हत्या कशी केली आणि त्यामागचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version