वीजमुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

वीजमुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांच्या वीजमुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाला १० तास वीज उपलब्ध करन द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूरमधील महावितरणाच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरण आंदोलन केले आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाला १० तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

विजेच्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडावे लागते. तसेच सर्पदंश, जंगली प्राण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, अशी मागणी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version