जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला होता, त्याप्रमाणे सोमवारपासून ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या रोखण्यास सुरवात करण्यात आली आहे.
पुणे, औरंगाबाद, बुलडाणा या ठिकाणी सकाळपासून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या फोडल्या आहेत, तर दूधही रस्त्यांवर फेकून दिलं आहे.
गोकुळ दूध संघाला आपलं दूध संकलन आज बंद ठेवावं लागलं आहे. दररोज सुमारे 11 लाख लिटर दुधाचं संकलन करणाऱ्या संघाच्या कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला.
त्यामुळे आजच्या या दूध आंदोलनाचा जोरदार फटका गोकूऴला बसला आहे. गोकुळचे सुमारे 5 कोटीचे नुकसान एका दिवसात झाले आहे.
आता मल्टिप्लेक्समध्ये नेण्यात येणार बाहेरचे खाद्यपदार्थ…
विठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.