BMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक

BMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक

वृत्तसंस्था, मुंबई

 

बीएमडब्ल्यूच्या S1000RR या बाईकला सुझुकीची सुपरबाईक तगडी टक्कर देणार आहे.

 

 

सुझुकी कंपनीने आपली नवी बाईक भारतात लाँच केली. GSX-R1000 असे या नव्या बाईकचं नाव असून, तब्बल 19 लाख रुपये इतकी किंमत आहे.

 

GSX-R1000 असेही याच बाईकचं अॅडव्हान्स मॉडेलही यावेळी लाँच करण्यात आले आहे.

 

मात्र, अॅडव्हान्स मॉडेलची किंमत 22 लाख रुपये आहे. बीएमडब्ल्यूच्या S1000RR ला सुझुकीच्या नव्या बाईकचं आव्हान असेल.

वजनाला हलकी, वेगवान अशी ही बाईक तितकीच हायटेक देखील आहे. याचा लुकही सुपरबाईक प्रमाणे  आहे.

 

 

बाजारातील सध्याच्या सुपरबाईक्सना आव्हान देण्यासाठी MototGP रेस मशीनपासून तयार झालेलं तंत्रज्ञान यात आहे.

 

सुझुकी GSX-R1000 बाईकचे बेस्ट फिचर्स

 

– 1000 सीसी

– इनलाईन फोन इंजिन

– 197bhp क्षमतेची आणि 117 Nm टॉर्क क्षमतेचे सहा स्पीड गिअरबॉक्स

– या बाईकच्या किंमतीत सर्वोत्तम इंजिन यामध्ये देण्यात आली

– GSX-R1000 तर GSX-R1000R मेटॅलिक ब्ल्यू आणि स्पार्कल ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version