पोलिस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू

पोलिस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे. दीपक भिंगारदिवेच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मागणी केली आहे.

दीपक भिंगारदिवे यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असला तरी पोलिसांनी मारहाण केल्याचे आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही उपलब्ध असून सीआयडी चौकशी केली जाईल. दीपक यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची सीआयडी चौकशी असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज पोलिस ठाण्यातीली सीसीटीव्ही कॅमे:यात कैद आहे. सीसीटीव्ही फूटेज सीआयडीकडे तपासकराती दिले जाईल. या प्रकरणाची चौकशीकरीता आवश्यक पंचनामे ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट फस्र्ट क्लास ठाणे यांच्या समक्ष केले जाणार आहेत.

नेमके काय झाले ?

कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस ठाण्यात काल रात्री ऑल आऊट ऑपरेशन सुरू होते. त्याअंतर्गत प्रशिक भिंगारदिवे या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. आपल्या मुलाला का आणले याबाबत विचारणा करण्यासाठी वडील दीपक भिंगारदिवे हे पोलीस ठाण्यात आले. दरम्यान पोलीस विचारपूस करत असताना दीपक आपल्य मोबाईलमधून शूटिंग करत होते. याच दरम्यान त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. काही वेळाने दिपक भिंगारदिवे यांना फिट आली. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगारदिवे कुटुंबियानी दीपक यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version