सुष्मिता पुन्हा झळकणार “या” सिरीजमध्ये

सुष्मिता पुन्हा झळकणार “या” सिरीजमध्ये

मुंबई,२६ एप्रिल २०२३,प्रतिनिधी:अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुष्मिताने आपल्या अभिनयाने सर्व चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अशातच, वयाची पन्नाशी गाठणारी सुष्मिताला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सुष्मिताने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा सुष्मिता अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. सुष्मिताने आर्या या पहिल्या वेबसिरीजमध्ये अभिनय केला होता. त्यानंतर आता पुन्हा या सिरीजच्या पुढच्या भागात सुष्मिता झळकणार आहे.

सुष्मिता समाज माध्यमांवर सातत्याने सक्रीय असते. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर सुष्मिताने आर्या ३ या आगामी वेब सिरीजच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. मंगळवारी इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर वेबेसिरीज चा प्रोमो सामायिक करत पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करत असल्याची घोषणा सुष्मिताने केली आहे. सामायिक केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सुष्मिता तलवारबाजी करताना दिसतेय. सुष्मिताच्या दोन्ही हातात तलवार दिसत असून त्याद्वारे ती दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. सोबत सुष्मिताने लिहिले की, ‘ती निडर आहे. ती परत आली आहे. ‘आर्या 3’ चे चित्रिकरण पुन्हा सुरू झाले.’

सुष्मिताला तिच्या प्रकृतीविषयी चर्चा नको होती. त्यामुळे तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. सुष्मिताने सांगितले होते, ‘मी मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचले आहे. ते खूप गंभीर होते. मला ९५% ब्लॉकेज होते. पण, हा एक टप्पा होता जो आता पार पडला आहे. मला त्याची अजिबात भीती वाटली नाही.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version