नवरात्रीमध्ये बंगाली समाजात दुर्गापुजो हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवातील एक वैशिष्ट्य म्हणजे या वेळी होणारा धुनुची नाच… हातात निखाऱ्याची भांडी धरून देवीसमोर हे नृत्य केलं जातं. माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हिने देखील या नृत्यात आपल्या मुलींसोबत सहभाग घेतला.
पांढऱ्या बंगाली पारंपरिक साडीमध्ये धुनुची नाच करणाऱ्या सुष्मिता सेनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान हिट होतोय. यामध्ये तिच्या सोबत रेने आणि एलिजा या तिच्या दोन मुलीदेखील आहेत. सोशल मीडियावर सध्या तिच्या या नृत्याची चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता सेनचा ‘दिलबर’ या तिच्याच जुन्या गाण्यावरील नाच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता पारंपरिक रूपातील सुष्मिताचं नृत्यही नेटिझन्सना तेवढंच भावलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.