मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या जाण्याने त्याचा चाहता वर्ग अजूनही हळहळ व्यक्त करत आहे. त्याने आत्महत्या केल्यानंतर नेमही तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेचा विषय झाला आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय बनला आहे.
सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘एम एस धोनी’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंगनं मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरील चित्रपट ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १२ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याला पुन्हा एकदा मोठ्या पदड्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.