जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
पोलीस खातं हे वर्णभेदावर चालत असल्याचा घणाघाती आरोप माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंनी केलाय. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटलांविरोधात 26/11च्या हल्ल्याबाबत मी लिहिलेल्या लेखाबाबत आक्षेप आहे.
त्यामुळे मी उभारलेली शांतीदुताची शिल्पे काढली जात असल्याचा आरोप खोपडेंनी केलाय. साताऱ्यात 8 फेब्रुवारीला पोलीस मुख्यालयासमोरील कबुतराचा पुतळा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर पुतळा हटवण्याविरोधात आंदोलन सुरु झाले.
मात्र, या प्रकरणानंतर पोलीस खातं हे वर्णभेदावर चालत असल्याचा आरोप माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.