“बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली” – सुप्रिया सुळे

“बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली” – सुप्रिया सुळे

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचं धक्कादायक विधान समोर आलं आहे. भाजप सरकार विरोधातील हल्लाबोल यात्रेत बोलत असताना त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. यावेळी व्यासपीठावर अनेक बड्या नेत्यांनी आपली उपस्थीती लावली होती. आम्ही ‘विनाकारण सत्ता गमावली’ असही त्या यावेळी बोलल्या.

हल्लाबोल यात्रे दरम्यान बोलत असताना, “विनाकारण सेल्फ डिफेन्समध्ये आम्ही गेलो आणि बोलून-बोलूनच सत्ता गमाविली”, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. सरकारविरोधतल्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळेंनी हे धक्कादायक विधान केलंय.

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अमळनेर, चोपडा, पारोळा, बोदवड, रावेर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या भाजप सरकार वर हल्लाबोल यात्रा आणि जाहिर सभा सुरू आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माज़ी मंत्री गुलाबराव देवकर, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, चित्रा ताई वाघ, हे राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. बड्या नेत्यांच्या उपस्थीतीत सुप्रिया सुळेच्या अशा धक्कादायक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version