…अन् सुप्रिया सुळेंनी दिली ‘त्याबाबत’ जाहीर कबूली

…अन् सुप्रिया सुळेंनी दिली ‘त्याबाबत’ जाहीर कबूली

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाल्याची प्रामाणिक कबुली देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोलाही लगावला.

 

राष्ट्रवादीची परिस्थिती अशी असली तरी राज्यात राष्ट्रवादीशिवाय एकही स्टोरी पूर्ण होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुप्रिया सुळे या सांगलीत बोलत होत्या.

 

आमच्या पक्षाच्या पडझडीवर खुली चर्चा केली जात आहे. याचा अर्थ अजूनही आमची काळजी काहींना आहे असा टोला काँग्रेस, भाजपचं नाव घेता सुप्रिया सुळेंनी लगावला.

 

दरम्यान, दाऊदच्या भावाला अटक करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी असेल तर जरूर कारवाई करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version