जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठी शाळांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान नाशिक येथे त्या बोलत होत्या.
मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेची एकही शाळा या सरकारने बंद केली तर या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घराच्या बाहेरही पडू देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज जिवंत असते तर त्यांनी एकही मराठी शाळा बंद करू दिली नसती असही त्या यावेळी म्हणाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.