मुख्यमंत्र्यांनी ज्योतिष शास्त्राचं दुकान लावावं; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

मुख्यमंत्र्यांनी ज्योतिष शास्त्राचं दुकान लावावं; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिष शास्त्राचं दुकान लावावं असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी

केला आहे.

 

अकोल्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आपण अनिसच्या कार्यकर्त्या असल्यानं कुंडलीवर आपला विश्वास नाही मात्र मुख्यमंत्र्यांना कुंडल्या

बघण्यासाठी शुभेच्छा असा टोलाही सुळे यांनी लगावला.

 

नेहमी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणाऱ्या सुप्रिया यांनी यावेळी शिवसेनेलाही चिमटा काढला. शिवसेनेनं मिठाशी आणि ताटाशी निष्ठा राखावी अशी जोरदार टीका सुप्रिया

सुळेंनी शिवसेनेवर केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version