तासभर वाट पाहूनही सुप्रिया सुळे आणि ‘त्यांची’ भेट होवू शकली नाही

तासभर वाट पाहूनही सुप्रिया सुळे आणि ‘त्यांची’ भेट होवू शकली नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मुंबईतील महिलांच्या समस्या घेऊन महानगर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना भेटण्यासाठी महापालिकेत पोहचल्या.

 

मात्र, तासभर वाट पाहूनही अजोय मेहता सुप्रिया सुळे यांना भेटले नाही. महापालिका सभागृह चालू असल्याने वेळे देऊनही सुप्रिया सुळे आणि आयुक्त भेट झाली नाही.

 

आधी भेटीसाठी 12.30 वेळ सुप्रिया सुळे यांना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुप्रिया सुळेंकडून 3.30 ची वेळ मागण्यात आली.

 

ठरलेल्या वेळेनुसार सुप्रिया सुळे आयुक्तांच्या भेटीला पोहचल्या. 3.30 ला जेव्हा सुप्रिया सुळे आयुक्तांच्या कार्यालयात पोहचल्या त्याच्या काही क्षण आधीच आयुक्त

आपल्या कार्यालयातून बाहेत पडले होते. त्यामुळे एक तास वाट पाहूनही सुप्रिया सुळेंची आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version