माध्यमकर्मीयांनो स्वत:ची काळजी घ्या, सुप्रिया सुळेंच आवाहन

माध्यमकर्मीयांनो स्वत:ची काळजी घ्या, सुप्रिया सुळेंच आवाहन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमकर्मीयांना फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कॅमेरामॅन एक्टिवावरुन गाडीचा पाठलाग करताना दिसत आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तासंघर्ष सुरु आहे. राज्यातील प्रत्येक घडामोडीवर माध्यमांची करडी नजर आहे. बातमीसाठी माध्यमकर्मी जमेल त्या प्रकारे प्रयत्न करत आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

सुप्रिया सुळेंनी माध्यमकर्मीयांसाठी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक्टिवावर असलेल्या कॅमेरामॅनचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. ब्रेकिंग बातमीचे महत्तव मी नाकारत नाही. पण त्यासोबतच रस्ते सुरक्षादेखील तेवढीच महत्वाचे आहे. या दोघांना पाहून मला त्यांची काळजी वाटते. या सर्व धावपळीत आपल्या स्वत:ची काळजी घ्या, असे आव्हान सुप्रिया सुळेंनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version