जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेवर हल्ला बोल मोर्चा काढलाय.
आज वर्धा जिल्ह्यातील भिडी येथे हा हल्लाबोल मोर्चा सुरु झाला. हल्ला बोल पुढे मार्गक्रमण करीत असतांना या मोर्चात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील सहभागी झाले होते.
मोर्चातील आदिवासी नृत्यावर स्वतः सुप्रिया सुळे थिरकल्यात . शेतकऱ्यांच्या समस्या या मोर्चातून जाणून घेतल्या . वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बो ड अळीने त्रस्त आहे या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्नही या मोर्चातून झालाय .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.