जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.
सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.! अशी पोस्टही त्यांनी टाकली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातील राजकारणातील धगधगते अग्निकुंड. या शिवतेजाने तब्बल पाच दशके मराठी माणसाच्या मनात अस्मितेची मशाल चेतवत ठेवली.
17 नोव्हेंबर 2012ला हे अग्निकुंड शांत झाले, परंतु आजही त्यांचे विचार मराठी माणसाला स्फूर्ती देतायेत. लाखो शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर दाखल होऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.