सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली महापालिकेला दणका

सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली महापालिकेला दणका

नवी दिल्लीतील हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून बुलडोधरच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दणका दिला आहे. तोडकाम त्वरित थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले आहेत.

जहांगीरपुरी येथे १६ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली महापालिकेकडून ९ बुलडोझरच्या मदतीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दणका देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत कारवाई थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात जहांगीरपुरी तोडक कारवाईवर सुनावणी पार पडणार आहे.

काय आहे प्रकरण?

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी दगडफेक, गोळीबारसुद्धा झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली असून परवानगी नसताना मिरवणूक काढल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहेत. दरम्यान, जहांगीरपुरीतील दंगलखोरांची बेकायदेशीर असलेली बांधकामे पाडण्याची मागणी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महापौरांना केली तसेच पत्राची एक प्रत पालिका आयुक्तांना पाठवण्यात आली होती. त्यांनतर दिल्ली महापालिकेकडून ९ बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिम करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दणका देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version