वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील विविध बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलयाने विजय मल्ल्याला दोषी ठरवले. याप्रकरणी मल्ल्याला 10 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, गेल्या महिन्यात 18 एप्रिलला लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी विजय मल्ल्याला अटक केली होती. पण पुढच्या तीनच तासांत त्याला सशर्त जामीनही मिळाला होता.
तेव्हापासूनच त्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पण त्यांना फारसं यश मिळत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.