जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतल्या फेरीवाल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना दणका दिला आहे.
फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करू देण्यास मनाई करताना मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाले केवळ फेरीवाला झोनमध्येच व्यवसाय करू शकतील, असं स्पष्ट केलं होतं. शिवाय, शाळा-कॉलेज, धार्मिकस्थळं, हॉस्पिटल्स यापासून 100 मीटर अंतरापर्यंत तर, रेल्वेस्टेशन आणि पालिकेच्या मंडयांपासून जवळपास 150 मीटर अंतरापर्यंत फेरीवाले व्यवसाय करण्यास उच्च न्यायालयानं मनाई केली आहे.
या निर्णयाला आव्हान देताना निरुपम यांनी फेरीवाल्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याचं म्हटलं होतं. परंतु ही मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट असल्याचं सांगत, सुप्रीम कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.