ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

ओबीसी आरक्षणासंबंधित सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र कामकाजाच्या नियोजनेनुसार काम वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने ओबीसी आरक्षणावर मंगळवारी दुपारी दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. उद्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण स्थगीत केल्याच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज दुपारी सुनावणी होणार होती. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आजची सुनावणी उद्या मंगळवारी होणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर असताना ओबीसी राजकीय आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version