वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दक्षिणेतील राजकारण्यांच्या चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पुढे नेत सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केलीये.
मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच माझा राजकीय पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल, असे तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते रजनीकांत यांनी जाहीर केलंय.
रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आगामी काळात तामिळनाडूतील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.