जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात दिसणार आहे. आगामी ‘बॉईज’ सिनेमाच्या एका गाण्यात सनी लियोनी थिरकणार आहे. या गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला.
आपल्या दिलखेचक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करणाऱ्या सनी लियोनीचं ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ हे गाणं रिलीज झालं. ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ आणि ‘मेरा बाबू’ ही दोन गाणी एकत्र करुन नवं गाणं तयार करण्यात आलं. याचं संगीतही ठेका धरायला लावणारं असल्याने प्रेक्षकांच्याही पसंतीस पडेल, यात शंका नाही. त्यात सनी लियोनीने अफलातून डान्सही केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.