सनीचं ‘डिंपल’प्रेम; साठीतही बहरतयं दोघांचं प्रेम

सनीचं ‘डिंपल’प्रेम; साठीतही बहरतयं दोघांचं प्रेम

वृत्तसंस्था, मुंबई

 

बॉलिवूड, अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत.

 

नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि  अॅक्शन हिरो सनी देओल.

 

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केला आहे.

 

लंडनमध्ये एका बसस्टॉपवर डिंपल आणि सनी एकमेकांचा हात हातात घट्ट धरुन बसलेले दिसत आहेत. आता दोघंही वयाच्या साठीत असताना जुन्या नात्याला उजाळा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version