साईदर्शन दुर्घटनेमागे असलेले आरोपी शिवसैनिक सुनील शितप यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

साईदर्शन दुर्घटनेमागे असलेले आरोपी शिवसैनिक सुनील शितप यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत साईदर्शन इमारत कोसळल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण शिवसेना कार्यकर्त्याच्या नर्सिंग होममुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.

 

शिवसैनिक सुनिल सितप याचं हे नर्सिंग होम आहे. तळमजल्यावर सितप याचं नर्सिंग होम होतं. तर वरच्या मजल्यावर रहिवासी राहत होते. सितप नर्सिंग होममध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरु होतं. तळमजल्यावरचे पीलर तोडून हॉस्पिटल वाढवलं असल्याचा आरोप सितपवर आहे.

 

पीलर तोडल्यानंच इमारतीला धोका निर्माण झाला होता असं इथले स्थानिक आता सांगत आहेत. निवासी इमारतीमध्ये हे नर्सिंग होम कसं. आणि नुतनीकरणाआधी परवानगी घेतली होती का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. महापालिका प्रशासनानं मात्र या नर्सिंग होममुळे दुर्घटना घडल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version