मेट्रोवर रविवारी मेगाब्लॉक

मेट्रोवर रविवारी मेगाब्लॉक

मेट्रो २ अ व मेट्रो ७वर प्रथमच मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यांच्या एकात्मिकीकरणासाठी रविवारी हे दोन्ही मार्ग १६ तासांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिका मुंबईच्या पश्चिम व मध्य उपनगरांना पूर्व व पश्चिमेकडून जोडतात. मेट्रो २ अ ही डी. एन. नगर ते दहिसर तर मेट्रो ७ ही गुंदवली (अंधेरीजवळ) ते दहिसर अशी आहे. दहिसर येथे प्रवासी या दोन्ही मार्गिकेचा उपयोग करू शकतात. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरू झाला. तर दुसऱ्या टप्प्याला काहीसा विलंब झाला असला तरी तो सुरू होण्याच्या बेतात आहे.

त्यासंबंधीच्या सिग्नल एकात्मिकरणासाठी या दोन्ही मार्गिका रविवारी सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान बंद असतील. मेट्रो २ अ सध्या पहिल्या टप्प्यात कांदिवलीजवळील डहाणूकरवाडी ते दहिसर तर मेट्रो ७ ही पहिल्या टप्प्यात आरे ते दहिसर अशी सुरू आहे. ‘मेट्रो २ अ’चा दुसरा टप्पा वळनई ते डी.एन नगर आणि मेट्रो ७चा दुसरा टप्पा गोरेगाव पूर्व ते गुंदवली असा असेल. दोन्ही मार्गिकांवर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या सिग्नलसह सर्व प्रकारचे एकात्मिकरण होणार आहे. त्यासाठीच उद्या डहाणूकरवाडी ते आरे या मार्गिका १६ तास बंद असतील, असे एमएमआरडीएकडून कळविण्यात आले आहे.

पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे. दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा कार्यरत करणे.  प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version