आज पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक !

आज पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी 10.30 पासून  दुपारी 3.30 या वेळेत  सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जम्बो ब्लॉक असल्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, ब्लॉक दरम्यान विलेपार्ले प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वर धीम्या मार्गावरील गाड्यांना डबल हॉल्ट दिला जाणार आहे.

 

जलद मार्गावरुन धावणाऱ्या गाड्या राम मंदिर येथे थांबणार नाही. तसेच पश्चिम रेल्वेच्या गाड्या थोड्या उशिराने धावणार आहेत. सर्व स्लो लोकलला विलेपार्ले स्थानकातील फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्र. 5 आणि 6 वर विशेष थांबा देण्यात येणार आहे. राममंदिर रेल्वे स्थानकात जलद मार्गासाठी  प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी गाड्या थांबणार नाही.

 

ब्लॉकवेळी काही लोकल रद्द करण्यात येतील तर मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version