रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रकानुसारच बाहेर पडा !

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रकानुसारच बाहेर पडा !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेवेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान सकाळी 11.20 ते 4.20 पर्यंत ब्लॉक आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन लोकलची वाहतूक सकाळी 11.1 ते 4.26 पर्यंत नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान बंद असणार आहे. पनवेल-अंधेरी लोकलची सेवा ब्लॉककालावधीत बंद राहील. या प्रवाशांसाठी सीएसएमटी ते नेरूळ आणि ट्रान्सहार्बरवर ठाणे ते नेरूळदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते 3.35 पर्यत अंधेरी ते बोरिवलीपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कुठेही बाहेर जाणार असाल तर वेळापत्रक बघूनच बाहेर जाण्याची तयारी करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version