लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु असून राज्यात 48 जागांसाठी मतदान पार पडले. अहमदनगरमधील भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांना पराभूत करत सुजय विखे पाटील यांनी जागा जिंकली आहे. दीड लाखांहून अधिक मतांनी सुजय विखे यांनी विजय मिळवला आहे.
राज्यात 48 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे.
यावेळी पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगरची जागा भाजपाने जिंकली आहे.
भाजपाचे सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसचे संग्राम जगताप यांना पराभूत करत जागा भाजपाच्या नावावर केली आहे.
नगरच्या जनतेने भाजपाच्या सुजय विखेंना दीड लाखाहून अधिक मतं दिली आहे.
निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता.
सुजय विखे पाटील हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या प्रचंड टीका करण्यात आली होती.
तसेच राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाचा प्रचार करतील का ? असा प्रश्न उपस्थित अनेकांनी केला होता.
राधाकृष्ण विखे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामाही दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.