जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
साखरेच्या दरातील घसरण अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात सत्तावीसशे ते अठ्ठावीसशेपर्यंत ते खाली आलेले असतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
साखरेचे दर 2000 सालातील साखरेच्या किमतीशी मिळते-जुळते असतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतयं. व्यापाऱ्यांना थेट साखर कारखान्यांकडून तीन हजार रुपयांपर्यंतचा दर वस्तू व सेवा करासह पडतो.
त्यात गाळप जोमाने सुरू असून उत्पादनात वाढत होत असल्याने साखरेच्या दरात घसरण होतच राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.