लवकरच सातव वेतन आयोग लागू होणार – सुधीर मुनगंटीवार

लवकरच सातव वेतन आयोग लागू होणार – सुधीर मुनगंटीवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या अर्थसंकल्पात खुशखबर मिळणार आहे. तशी घोषणा देखील विधानपरिषदेत झाली आहे. लवकरच केंद्राप्रमाणे राज्यातही सातव वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबतची माहिती दिली.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे यावर्षीच हे वेतन आयोग लागू होणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी त्यावेळी दिलं आहे.

आमदार कपिल पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत टकले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत, सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचारणा देखाल केली. त्यावर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.

सातव वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 21 हजार 530 कोटी रुपयांचा वाढीव बोजा पडणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांचा तोटा होणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले. जो 21 हजार 530 कोटींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, त्याची तरतूद अर्थसंकल्पात करु, असं मुनगंटीवारांनी नमूद केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version