नारायण राणेंवर यशस्वी शस्त्रक्रिया

नारायण राणेंवर यशस्वी शस्त्रक्रिया

हदृयाच्या दुखण्याला त्रस्त असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी गेले असताना त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यामध्ये काही ब्लॉकेजेच आढळून आले. म्हणूनच त्यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

शस्त्रक्रियदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृती बघुन दोन ते तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री आसल्याने त्यांच्यावर केंद्रीय जबाबदारी, कामाचा आवाका जास्त असल्याने कामाच्या त्रासामुळे राणे यांना त्रास जाणवू लागल्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हदृयाचा त्रास जाणवत होता परंतू आज त्रास जास्त जाणवू लागल्याने त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल केले आणि आज त्यांच्यावर यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

नारायण राणे यांनी जनयात्रेतून मुख्यमंत्र्यांवर टिका केली होती त्यांनतर शिवसैनिक आक्रमक झाल्याने तिव्र पडसाद राज्यात पाहायला मिळाले, त्यामुळे, ही जनयात्रा थांबली होती. आती ही जनयात्रा सिंधुदुर्ग येथुन शनिवारपासून सुरू होणार आहे. कणकवली येथे जनयात्रा जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर नारायण राणे रूटीन चेकअपसाठी लिलावती रूग्णालयात गेले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version