जिल्हा बँकांच्या अडचणींन संदर्भात सुभाष देशमुख यांच धक्कादायक वक्तव्य

जिल्हा बँकांच्या अडचणींन संदर्भात सुभाष देशमुख यांच धक्कादायक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
राज्यातील जिल्हा बँक आर्थिक संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र हात झटकले आहेत. जिल्हा बँक संदर्भात येत असलेल्या अडचणी रिजर्व बँक बघेल अशी भूमिका सहकार मंत्र्यांनी घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यातील आठ जिल्हा बँकेत नोट बंदी काळात जमा झालेले पैसे रिजर्व बँकेने घेण्यास नकार दिल्याने राज्यातील काही जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, हा विषय जिल्हा बँक आणि रिजर्व बँकेचा आहे. त्यामुळे रिजर्व बँक या संदर्भात तोडगा काढेल अस देशमुख म्हणाले.

या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली असताना, सुभाष देशमुख यांनी केलेल्या वक्त्यामुळे राज्य सरकार जिल्हा बँकांना वाऱ्यावर सोडत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक मधे आयोजित सहकार विभागाच्या बैठकीला सुभाष देशमुख आले असता ते बोलत होते. तसेच, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठीला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्याना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे देखील त्यांनी यावेळेस सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतीमालाचे पैसे व्यापऱ्यांनी वेळेवर अदा केले नाही तर त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील देशमुख यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत असतो त्यामुळे जिल्ह्यात लवकरच भाजीपाला कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणणार असल्याचं देखील सहकार मंत्र्यांनी सांगितले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version