जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी आतापर्यंत 77 लाख 26 हजार अर्ज आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळेल असं आश्वासन दिलं होते.
मात्र, शेतकऱ्यांना एक ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम देणं अशक्य असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी सांगितले.
जिल्हा बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांची माहिती आलेली नसल्यामुळे कर्जमाफीला उशीर होणार असल्याचं सुभाष देशमुखांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.