…अशा तऱ्हेने विद्यार्थीच मुंबई विद्यापीठाला धरणार धारेवर !

…अशा तऱ्हेने विद्यार्थीच मुंबई विद्यापीठाला धरणार धारेवर !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपून 5 महिने होत आहेत मात्र, अद्याप 28 हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यापीठाविरोधात संताप व्यक्त करत ‘राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस’तर्फे एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे.

 

डॉ.संजय देशमुख यांना कुलगुरू व विद्यापीठाच्या प्रशासनातून हद्दपार करावे, निकाल विलंबाची चौकशी करावी, निकाल गोंधळाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version