वसई पूर्वेच्या खैरपाडा परिसरातील 14 वर्षीय सागर दुबे नामक एका शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सागरच्या पालकांनी त्याची शाळेची फी भरली नव्हती. मात्र शाळेतून वारंवार फी भरण्याबाबतीत दबाव येत होता. त्यामुळे या गोष्टीचा धसका घेऊन सागरने आठ तारखेला गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
सागरने एक सुसाईड नोट लिहून त्यात आपल्या मृत्यूला घराचे जबाबदार नसून शाळेच्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलंय.
सागरच्या पालकांना आणि परिसरातील नागरिकांनाही या घटनेने धक्का बसला आहे. शाळेची फी बाकी असण्यासारखी गोष्ट एका 14 वर्षांच्या मुलाला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पडू शकते का, असा प्रश्न पडला आहे. मात्र शाळा प्रशासन शिक्षणाचा फक्त धंदा करण्यासाठी शाळा चालवत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. शाळा प्रशासनाने सारे आरोप फेटाळले आहे. तर पोलिसांनीही अजून शाळा प्रशासनाच्या विरोधात कोणतीही कारवाई केल्याचं दिसत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.