मुंबईत पावसाची दमदार सुरुवात

मुंबईत पावसाची दमदार सुरुवात

राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात असून काही ठिकाणी ट्राफिक जॅम देखील झाले आहे. पावसाचे पाणी सखल भागात साचायला लागले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

राज्यात पावसाने काही भागात तूफान हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत देखील गेल्या काही दिवसांपासूंन संततधार सुरू आहे. आज सकाळ पासून मुंबई, ठाणे आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परिणामी वाहतूक देखील मंदावली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरीत सबवे मध्ये पाणी भरले आहे. या सोबतच दादर, सायनमध्ये सखल भागात पाणी साठले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक विभागाने ट्विट करून दिली आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. रात्री उशिरापासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक मंदावली आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. सकाळपासून ठाण्यासह अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागांतही मुसळधार पाऊस होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस तळ कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version